PPF Account : केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. ज्याचा फायदा लाखो सर्वसामान्य लोकांना होत आहे. यापैकीच एक योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. देशभरातील लाखो लोक या योजनेचा फायदा घेत आहेत.
गुंतवणूकदारांना या योजनेत चांगले व्याज मिळत असून त्यांना या योजनेत कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. परंतु, दरवर्षी कितीतरी जणांचे पीपीएफ खाते बंद पडते. जर तुमचेही पीपीएफ खाते बंद पडले असेल तर काळजी करू नका. तुमचे खाते पुन्हा चालू होईल. कसे ते जाणून घ्या.
असे होते खाते निष्क्रिय
जर तुम्ही तुमच्या PPF खात्यात वार्षिक कमीत कमी 500 रुपये जमा करू शकत नसाल तर, तुमचे खाते निष्क्रिय होऊ शकते. तसेच, निष्क्रिय झाल्यानंतरही, तुमच्या PPF खात्यावर प्रत्येक वर्षी व्याज मिळते.
काय आहे तोटे?
पीपीएफ खाते निष्क्रिय झाल्याने अनेक गैरसोय होत आहेत. जितके वर्ष तुमचे खाते बंद राहील, तितके वर्षांसाठी तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. तसेच तुम्हाला पीपीएफवर कर्ज दिले जात नाही.
असे ठेवा पीपीएफ खाते सक्रिय
जर तुम्हाला तुमचे पीपीएफ खाते सक्रिय किंवा रीस्टार्ट करायचे असल्यास त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या शाखेत किंवा पोस्टवर जावे लागणार आहे. त्यानंतर त्यासाठी तेथे अर्ज देणे गरजेचे आहे. तसेच, PPF खाते किती वर्षे निष्क्रिय होते, त्याच्या पटीत तुम्हाला रु. 500 + 50 रुपये दंड भरावा लागणार आहे.
समजा, जर तुमचे PPF खाते चार वर्षांसाठी बंद असेल तर, तुम्हाला (500*4) रुपये 2000 आणि (50*4) रुपये 200 दंड भरावा लागणार आहे. तुम्हाला चालू आर्थिक वर्षासाठी किमान 500 रुपये पीपीएफ योगदान देखील द्यावे लागणार आहे.जर तुम्ही पीपीएफ खाते उघडून 15 वर्षांहून अधिक काळ लोटला असल्यास तुम्हाला ते खाते पुन्हा सक्रिय करता येणार नाही.
गुंतवणुकीवर मिळते कर सवलत
PPF ही खूप चांगली गुंतवणूक योजना असून तिचे व्याज देखील FD पेक्षा किंचित जास्त असते. सध्या सरकारकडून PPF वर ७.१ टक्के व्याज देण्यात येत आहे. यात गुंतवणूक केल्यावर आयकराच्या कलम 80C अंतर्गत एखाद्या व्यक्तीला 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जाते.