…अन् एकाच क्षणात होत्याचे नव्हते झाले!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  भरधाव वेगात आलेल्या स्कार्पिओने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पिता पुत्राचा दुर्दैवी अंत झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

किरण पांडुरंग झांबरे (वय २८) व शौर्य (वय अडीच वर्ष) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत.

तर शुभांगी किरण झांबरे ही गंभीर जखमी आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शेवगाव-गेवराई मार्गावरील सोनेसागंवी फट्यानजीक घडली.

नवरीसोबत करवली गेलेल्या पत्नीला घरी दुचाकीवर घेऊन येत असतानाच ही दुर्घटना घडली.

याबाबत सविस्तर असे की, किरण पांडुरंग झांबरे यांच्या शेवगाव तालुक्यातील नजीक बाभुळगाव येथील मावस बहिणीचे बुधवारी लग्न झाले होते.

लग्नानंतर नवरीसोबत किरण यांची पत्नी शुभांगी ही कलवरी म्हणून गेली होती. शुक्रवारी ती नवरीसोबत माघारी बाभूळगाव येथे आली.

यावेळी तिला घरी घेऊन येण्यासाठी किरण झांबरे हे दुचाकीवरून आपला अडीच वर्षाचा एकुलता एक मुलगा शौर्य याला सोबत घेऊन बाभूळगाव येथे गेले.

सायंकाळी पत्नी व मुलगा असे तिघेजन दुचाकीवरून येत असताना शेवगाव-गेवराई मार्गावरील सोनेसागंवीी फाट्यानजीक

त्यांच्या दुचाकीला चापडगाव मार्गे भरधाव वेगाने येणाऱ्या (एम.एच.-१४, एफ.एस. ९१००) या क्रमांकाच्या स्कॉर्पिओने समोरून जोराची धडक दिली.

यात दुचाकीवरील किरण झांबरे व त्यांचा अडीच वर्षीय चिमुरडा शौर्य या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे असलेली पत्नी शुभांगी रस्त्याच्या कडेला उडून पडल्याने गंभीर जखमी झाली.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe