पाचशेची बनावट नोट माथी मारण्यात आल्याने चांगलाच मनस्ताप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-अगोदरच लॉकडाउनमुळे परेशान झालेल्या लोकांना रोजगाराच्या चिंतेने ग्रासले असून त्यातच एका हातावर पोट भरणाऱ्या तरुणाला व्यवसाय करताना

रात्रीच्या वेळी काही दिवसांपूर्वीच पाचशेची बनावट नोट माथी मारण्यात आल्याने चांगलाच मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना शिर्डी शहरात घडली.

काही दिवसांपूर्वी शिर्डीत एका तरुणाला कुणीतरी पाचशे रुपयांची हुबेहूब दिसणारी बनावट नोट दिली. या नोटेत हिरव्या रंगाचे प्रमाण जास्त असुन कागददेखील हलका आहे. नोटेमध्ये चांदीची तार नसुन गव्हर्नरच्या सहीतदेखील फरक आहे.

नोटेच्या लांबीमध्ये थोडासा फरक दिसत असला तरी बारकाईने पाहिले तरच ही नोट बनावट असल्याचे लक्षात येते; परंतु बनावट जरी असली तरी सहजासहजी घाई गडबडीत लक्षात येणार नाही याची काळजीदेखील घेतली असावी.

बनावट नोटा हा गंभीर गुन्हा असला तरी कोणी फारशा तक्रारीच्या फंदात पडत नाही. सरकारी बॅँकेत अशा नोटा आल्या, तरी योग्य प्रक्रिया पूर्ण करुन पोलीस प्रशासनाकडे माहिती दिली जाते; मात्र व्यक्ती असेल,

तर अगोदरच झालेला आर्थिक भुर्दंड व झालेला मनस्ताप यामुळे आणखी त्रास करुन घेण्यासाठी मानसिकता दिसून येत नाही. त्यामुळे लोकांनी नोटा घेताना पाहून घेतल्या पाहिजे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe