चोर काय करतील ते सांगता येणार नाही, एटीएम मशीनची काच फुटली अन त्यांचा प्लॅन फसला..

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- अलीकडे चोरटे चोरी करण्यासाठी काय करतील ते सांगता येणार नाही. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन गाडीला बांधून ओढत घेवून जाण्याचा बेत होता.

तसा त्यांनी प्रयत्न देखील केला मात्र काच फुटली अन सर्व प्लॅन फसला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम मध्ये प्रवेश करुन अगोदर एटीएममधील कॅमेरे बंद केले, नंतर बरोबर आणलेल्या मालवाहू पिकअपला रोपवे बांधुन एटीएम मशीन उपसुन काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र सुदैवाने केवळ मशीनच्या स्क्रीनचा वरील भागच उपसला गेला व त्यामुळे पैसे असलेला मशीनचा कंपारमेंट सुरक्षित राहिला. मशीन उपसत असताना एटीएमची समोरील काच फुटल्याने मोठा आवाज झाल्याने चोरट्यांनी पळ काढला.

सदर एटीएम स्टेट बँकेच्या शाखेच्या अगदी जवळ आहे. एटीएम २४ तास उघडे असुनही तेथील सुरक्षेसाठी कोणताही सुरक्षारक्षक नेमलेला नाही त्यामुळे रात्री हे एटीएमसाठी पुर्णपणे बेवारस असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News