अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका तरूण शेतकऱ्याने गंभीर आरोप लावले आहेत. ऊसाला तोड दिली जात नसेल तर ऊस पेटवून देऊ, यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण देत असल्याचं तरूण शेतकऱ्याने म्हटलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावातील ऋषिकेश शेटे यांनी शेतकऱ्याच्या मरणाच्या सोहळ्याचं आमंत्रण देतोय म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, यात शिवसेना मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
शंकरराव गडाख हे विरोधक शेतकऱ्यांचे हजारो एकर ऊस मुद्दामहून तोडून देत नाहीत, चक्करा मारूनही ऊसतोडीची नोंद घेत नाही. शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे, शेतकऱ्यांनी या जाचाला कंटाळून ऊस पेटवून देण्याचं ठरवलं आहे, इतकचं नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(यांनी दखल घेतली नाही तर ऊसात आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
दुष्काळातून होरपळलेलो असताना सरकारी मदत झाली नाही, कष्टाने ऊस पिकवला तरी दीड वर्ष झाली ऊसाला तोड नाही असा आरोप या तरूण शेतकऱ्याने केला आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्ह्याला दिलेलं मंत्रिपद आमच्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरत नाही, त्या मंत्र्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ आली आहे,
शंकरराव गडाख हे शेतकऱ्यांना टार्गेट करतात. तुम्ही दिलेल्या मंत्रिपदाचा दुरूपयोग केला जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मरणाचा सोहळा पाहण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व पक्षाच्या मंत्र्यांनी उपस्थित राहावं असं ऋषिकेश शेटे या तरूण शेतकऱ्याने सांगितले आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved