ITR Verification : मूल्यांकन वर्ष 2022-23 (assessment year 2022-23) साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत आधीच संपली आहे.
सरकारी (government) आकडेवारीनुसार, यावेळी अंतिम मुदत म्हणजेच 31 जुलैपर्यंत सुमारे 5.83 कोटी करदात्यांनी आयटीआर दाखल केला आहे. यापैकी अनेकांच्या रिटर्नवर प्रक्रिया करण्यात आली असून त्यांना प्राप्तिकर रिफंड (Income Tax Refund) जारी करण्यात आला आहे.
रिफंडच्या प्रक्रियेसाठी आणि रिफंड साठी ITR verification आवश्यक आहे. वास्तविक, पडताळणीनंतर (verification) प्राप्तिकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया पूर्ण होते. जर तुम्ही अजून तुमचा ITR verification केला नसेल तर विलंब न लावता हे काम पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.
verification चा वेळ कमी झाला
आयकर विभागाने आता ITR प्रक्रिया आणि रिफंड जारी करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. आता बहुतेक करदात्यांना आयटीआर दाखल केल्यानंतर केवळ 2 आठवड्यांच्या आत रिफंडचे पैसे मिळू लागले आहेत.
प्राप्तिकर विभागाच्या नवीन प्रणालीनुसार, आता कोणताही करदाता रिटर्न भरल्यानंतर 10 दिवसांनी रिफंडची स्थिती तपासू शकतो. मात्र, यासाठी आयटीआर भरल्यानंतर त्याला वेरिफाई करणे आवश्यक आहे. यापूर्वी, आयटीआर दाखल केल्यानंतर करदात्यांना 120 दिवसांचा कालावधी मिळत होता, जो आता फक्त 30 दिवसांवर आणला आहे.
verify करणे आवश्यक
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 29 जुलै 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले होते की, ITRverify साठी नवीन नियम 01 ऑगस्ट 2022 पासून लागू होतील. 01 ऑगस्ट 2022 नंतर आयटीआर फाइल करणाऱ्यांना verifyसाठी फक्त 30 दिवस असतील.
त्याच वेळी, ज्या लोकांनी हे काम आयटीआर दाखल करण्याच्या अंतिम मुदती म्हणजेच 31 जुलैपर्यंत पूर्ण केले आहे, त्यांना verifyसाठी 120 दिवस मिळतील. सीबीडीटीने अधिसूचनेत असेही स्पष्ट केले होते की जर करदात्याने 30 दिवसांच्या मुदतीनंतर आयटीआर verify केला , तर अशा प्रकरणांमध्ये verifyची तारीख ही आयकर विवरणपत्र सादर करण्याची तारीख मानली जाईल.
अशा परिस्थितीत, करदात्याला प्राप्तिकर कायदा 1961 अंतर्गत दंडासह विवरणपत्र उशिरा दाखल केल्याच्या इतर प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागेल. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की अशा प्रकरणांमध्ये करदात्याला 5000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
रिफंड verify करण्याचे 2 मार्ग आहेत. पहिली पद्धत इलेक्ट्रॉनिक आहे, ज्यामध्ये बँक खाते किंवा आधारवरून पडताळणी करता येते. दुसरा मार्ग म्हणजे पोस्टाद्वारे ITR-V ची स्वाक्षरी केलेली प्रत पाठवून त्याची पडताळणी करणे.
या कारणांमुळेही रिफंड अडकला
अनेक प्रकरणांमध्ये, आयटीआर पडताळल्यानंतरही आयकर रिफंडअडकतो. रिफंड अडकण्याच्या प्रकरणांमध्ये एक प्रमुख कारण म्हणजे बँक खात्याच्या तपशीलातील चूक. फॉर्म भरताना तुम्ही तुमच्या खात्याचा तपशील चुकीचा टाकला असेल, तर त्यामुळे तुमचा रिफंड अडकू शकतो.
अशा परिस्थितीत, तुम्हाला आयकर विभागाच्या साइटवरील खात्याचे तपशील दुरुस्त करावे लागतील. बँक खाते पॅनकार्डशी लिंक करणेही आवश्यक आहे. याशिवाय काही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असल्यानेही रिफंड मिळण्यास विलंब होत आहे.
प्राप्तिकर विभाग काही वेळा रिटर्न प्रक्रिया करताना काही कागदपत्रांची मागणी करतो. अनेक प्रकरणांमध्ये, कर थकबाकीमुळे परतावा अडकतो. मात्र, या परिस्थितीतही आयकर विभाग करदात्याला नोटीस पाठवून माहिती देतो.