जगताप कडाडले…तर पुणे जिल्ह्यातील एकाही बंधाऱ्यात पाणी सोडू देणार नाही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंदेकरांना कायमच संघर्ष करावा लागतोय. दरम्यान पिंपळगाव जोगे धरणातील पाण्यावर न्यायालयाने स्थगिती दिल्याने अडचणीत भर पडली आहे.

यामुळे राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार राहूल जगताप हे चांगलेच कडाडले आहे. पाणी प्रश्नबाबत जगताप यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

पुणे जिल्ह्यातील बंधाऱ्यात सोडले जाणाऱ्या बेकायदा पाण्याबाबत त्यांनी थेट आक्षेप घेतला आहे. जगताप म्हणाले, न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय उद्या होईल.

मात्र, ज्या पध्दतीने जुन्नर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाणी अडविण्याचा प्रयत्न होत आहे तो दुर्देवी आहे.

आम्हाला जर पाणी मिळाले नाही तर पुणे जिल्ह्यातील एकाही बंधाऱ्यात पाणी सोडू देणार नाही, त्यासाठी वाट्टेल तो संघर्ष करण्याची तयारी असल्याचा इशारा राहूल जगताप यांनी दिला. आमच्या पाण्यावर जर कुणी टाच आणणार असेल तर आम्हीही त्या बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडू देणार नाही.

नगरकरांचे कुणी नाक दाबणार असले तर आम्हीही पुणेकरांचे तोंड दाबू शकतो हे सगळ्यांनीच लक्षात ठेवले पाहिजे. असा इशाराच राहुल जगताप यांनी दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe