रुग्णांच्या श्वासासाठी धावणाऱ्या ऑक्सिजनचा टॅंकरला जामखेडकरांचा ‘दे धक्का’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये बिघाड होण्याच्या घटना राज्यात ठिकठिकाणी घडत आहेत. पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने त्यांच्यासोबत पोलिस बंदोबस्त दिला आहे.

मात्र टँकरच्या दुरूस्ती, देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. यामुळे बीड साठी निघालेला ऑक्सिजनचा टँकर नांगर जिल्ह्यातच दोनदा बंद पडला.

यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ झाली. या घटना घडू नये यासाठी प्रशासनाने याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि बीडला ऑक्सिजन घेऊन जाणारा टँकर जामखेडजवळ दोनदा बंद पडला. जामखेडकरांनी तातडीने धडपड करून दुरूस्ती केल्याने फारसा उशीर न होता टँकर बीडला पोहचला.

ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या टँकरला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.मात्र, त्याच्यात तांत्रिक बिघाड होणार नाही, याकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाही.

म्हणूनच सोमवारी पहाटे बीडला जाणारा हा टँकर जामखेडजवळ दोनदा बंद पडला.प्रथम जामखेड शहराजवळ हा टँकर बंद पडला. काही वेळात दुरूस्ती होऊन टँकर जामखेडहून पुढे रवाना झाला.

जामखेडपासून पुढे गेल्यावर सौताडा घाटात टँकर पुन्हा बंद पडला होता. जामखेडकर पुन्हा मदतीला धावले. टँकरची दुरूस्ती करून पुढे रवाना करण्यात आला.

अखेर टँकर बीडच्या जिल्हा रुग्णालयात सुखरूप पोहचल्याचा निरोप आल्यावरच जामखेडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि बीडमधील रुग्णांचा टांगणीला लागलेला श्वास मोकळा झाला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe