पुरग्रस्तांना मदतीचा हात देऊन जनमोर्चाने मानवतेचे दर्शन घडविले – एस.पी. मनोज पाटील

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- नगर – कोकण, प.महाराष्ट्रात पुराच्या तडाख्याने तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले, काहीचा तर घरातील संसार वाहून गेला अशांना मदतीची जी गरज आहे, ती लक्षात घेऊन ओबीसी जनमोर्चाने पुरग्रस्तांना मदतीचा हात देऊन मानवतेचे दर्शन घडविले, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले.

ते पुढे म्हणाले, विशिष्ट समाजाला हक्क मिळवून देणे या ध्येयाने कार्यरत असलेल्या जनमोर्चाकडून सामाजिक जाणिव ठेवून पुरग्रस्तांना दिलेली मदत निश्चित मानवधर्माचे पालन करणारे आहे. जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या सूचनेनुसार संघटनेच्या नगर शाखेने 125 क्विंटल अन्नधान्यासह किराणा, कपडे अशी मदत संघटनेचे पदाधिकारी,

सदस्यांना दिली ते साहित्य श्री.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरग्रस्त कन्हेगाव (ता.वाळवा, जि.सांगली) येथे ट्रकने रवाना करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी बाबासाहेब सानप होते. नंदनवन लॉन्स टिळक रोड येथे झालेल्या या कार्यक्रमाला गुन्हे अन्वेषन विभागाचे उपअधिक्षक राजेंद्र पाटील उपस्थित होते.

पुराचा तडाखा बसलेल्यांना प्रत्यक्ष भेटून प्रत्येक घर 20 कि. अन्नधान्य, किराणा, कपडे, असं साहित्य वाटप करण्यात येणार आहे,अशी माहिती जनमोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, उपाध्यक्ष रमेश सानप यांनी दिली तर ग्रामीण दुर्लक्षित असे आदिवासी भागात पुराचा बसलेला तडाखा अशा ठिकाणी मदतीची खरी गरज आहे ते लक्षात घेऊन हा उपक्रम करण्याचा प्रयत्न आहे, असे माजी महापौर भगवान फुलसौंदर व नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले.

यावेळी सुनिल भिंगारे, भगवान फुलसौंदर, दत्ता जाधव, बाळासाहेब बोराटे, संजय आव्हाड, बाळासाहेब भुजबळ, श्रीकांत मांढरे, चंद्रकांत फुलारी, फिरोज खान, महिला जिल्हाध्यक्षा सुषमा पडोळे, कैलास गर्जे, अनिल निकम, दिपक खेडकर, अनिल इवळे, अशोक तुपे, शामराव औटी, डॉ.सुदर्शन गोरे, बाबासाहेब सानप, रमेश सानप, अनुरिता झगडे, प्रकाश लोळगे, विजय काळे,

माऊली गायकवाड, राजेश सटाणकर, मनोज भुजबळ, शशिकांत पवार,शौकतभाई तांबोळी, राजेंद्र पडोळे, वनिता बिडवे, निलेश जाधव, राजु निमसे, पंकज गुंदेचा, सपना गांधी, शरद कोंडा, हरि गाढवे, दत्तात्रय धाडगे आदि दानशूर सदस्यांनी पुरग्रस्तांसाठी सढळ हाताने मदत केली.

तांदूळ, गहू पीठ, कांदा, बटाटा, साखर, तेल, मसाला, मीठ, चिवडा असं किराणा साहित्याचा यात समावेश आहे. तर साबत, टूथपेस्ट, ब्रश, पानी बॉटल, मुलींचे कपडे, टी-शर्ट आदि आवश्यक साहित्य ही देणगी दाखल मिळाले असून, ट्रक वाहतुक खर्च, पॅकिंग साहित्य आदि खर्चासाठी काहींनी रोख रक्कमही देणगी म्हणून दिली आहे.

मदत जमा करुन 120 किट तयार करुन पॅकिंगसाठी सदस्यांनी परिश्रम घेतले. याही उल्लेख यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमास परेश लोखंडे, कैलास गर्जे, श्रीकांत मांढरे, संजय आव्हाड, शशिकांत पवार, माऊली गायकवाड, प्रकाश सैंदर, विनोद पुंड, फिरोजभाई, अनिल इवळे, शाम औटी, कैलास दळवी, नईम शेख, राजू पडोळे, संजय जाधव, आशा पालवे, रजनी ताठे, मनोज भुजबळ आदि उपस्थित होते. शेवटी राजेश सटाणकर यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News