जनसेवा ॲप सामान्यांना आधार ठरेल- माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- कोविड संकटाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून रुग्णालयांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, म्हणून विकसित करण्यात आलेले जनसेवा केअर ॲप शिर्डी मतदारसंघातील नागरीकांसाठी मोठा आधार ठरेल, असा विश्वास माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

रुग्णालयांची माहिती मिळण्यासाठी कोविडच्या दुसऱ्या लाटेत सर्वांचीच झालेली धावपळ लक्षात घेऊन ही ससेहोलपट थांबविण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जनसेवा केअर ॲप विकसित करण्यात आले.

या ॲपचे औपचारिक विमोचन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. प्रवरा कोविड सेंटरमध्ये प्राचार्य प्रदीप दिघे, डॉ. किरण आहेर, डॉ. निलेश पारखे, डॉ. धनंजय धनवटे, भारत घोगरे उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News