ऑक्सिजन, रेमडेसिवीरसाठी जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचा ठिय्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-ठाण्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येथे रोज हजारो रुग्ण आढळत आहेत. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे येथे आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा उडाले आहेत.

रुग्णांना ऑक्सिजन तसेच रेमडेसिव्हीर इंजेक्शन वेळेवर मिळत नाहीये. याच प्रश्नाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड याच्या पत्नी ऋता आव्हाड आक्रमक झाल्या.

त्यांनी ठाणे महापालिकेच्या दालनाखाली ऑक्सिजन आणि रेमडिसिव्हरच्या तुटवड्याबाबत ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलनामध्ये मनसेचे ठाण्याचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्तेसुद्धा सहभागी झाले होते. यावेळी ऋता आव्हाड यांनी ठाणे महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

तसेच ठाणे महापालिकेवर आरोग्य व्यवस्थेशी संबंधित अनेक आरोप केले. यावेळी आंदोलन करताना रुता आव्हाड यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यांनी कोरोना आणि रुग्णांच्या उपचाराबाबत ठाणे मनपा गंभीर दिसत नसल्याचा आरोप केला.

तसेच ऋता आव्हाड आणि मनपाचे विरोधी पक्षनेता शानू पठाण यांनी पालिका इमारतीच्या प्रवेशद्वारावर ऑक्सिजन फलक आणि ऑक्सिजन सिलिंडर घेऊन घोषणाबाजी केली.

ठाण्यातील कोरोनास्थितीवरुन ऋता आव्हाड आक्रमक झाल्यानंतर त्यांना तसेच मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला गेला.

मात्र, त्यांनी ठिय्या आंदोलन केल्यामुळे येथे काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe