10 वी पास असणाऱ्यांसाठी संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी ; वाचा सविस्तर…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- संरक्षण मंत्रालयाने सी / ओ 56 एपीओच्या 41 फील्ड एम्यूनिशन डेपोमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 458 रिक्त जागा भरती करण्यात येणार आहेत.

इच्छुक उमेदवार या पदांसाठी 21 दिवसांपर्यंत म्हणजेच 30 जुलै रोजी सूचना जाहीर होण्याच्या तारखेपासून अर्ज करू शकतात.

पद संख्या- 458

  • पद                                          संख्या
  • ट्रेडमेन मेट (प्रथम मजूर)            330
  • जेओए (आधीचा एलडीसी)         20
  • साहित्य सहाय्यक (एमए)            19
  • एमटीएस                                    11
  • फायरमन                                    64
  • 255 (आई) एबीओयू ट्रेड्समैन मेट 14

पात्रता – या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दहावी, बारावी, पदवी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक माहितीसाठी अधिकृत सूचना पहा.

वय – अर्जदारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. वयोमर्यादेशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी आपण अधिकृत सूचना पाहू शकता.

सिलेक्शन प्रोसेस – या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल.

पगार – निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18000 ते 92,300 रुपये पगार देण्यात येईल.

या प्रमाणे अर्ज करा – इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफिशियल वेबसाइट indianarmy.nic.in या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज भरुन खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत सूचना पहा.

पत्ता- कमांडेंट, 41 फील्ड एम्यूनिशन डिपो, पिन – 909741।

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!