अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशात मोठा कल्लोळ माजला आहे. त्यातच काबूल विमानतळ दोन स्फोटांनी हादरल्याची धक्कादायक घटना घडली.
विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले. मृतांमध्ये १३ अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे संतप्त झाले आहे. ‘या हल्ल्यांची किंमत चुकवावी लागणार असून आम्ही हे विसरणार नाही आणि आता दहशतवाद्यांच्या चुकीला माफी नाही.
आम्ही दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करू. अफगाणिस्तान राहत असलेल्या आमच्या नागरिकांना वाचवू’, असे जो बायडेन म्हणाले. काबूलमधील हल्ल्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला काही वेळ मौन बाळगून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच अमेरिकेचा राष्ट्रध्वज एका दिवसासाठी अर्ध्यावर उतरवण्यात आलाय.
‘हे कोणी घडवून आणलं आहे याचा अंदाज आपल्या सर्वांनाच आहे पण त्याबद्दल आपल्याला अद्याप खात्री नाहीय,’ असं बायडेन यांनी हा हल्ला घडवून आणणाऱ्यांबद्दल बोलताना सांगितले. व्हाइट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना बायडेन यांनी इस्लामिक स्टेटशी संलग्न दहशतवादी संघटनांना थेट इशारा दिलाय. आम्ही हा हल्ला विसरणार नाही आणि यासाठी हल्लेखोरांना माफीही मिळणार नाही असं बायडेन म्हणाले आहेत.
‘ज्यांनी हे हल्ले घडवून आणलेत आणि ज्यांना अमेरिकेला त्रास देण्याची इच्छा आहे त्यांनी लक्षात ठेवावं की आम्ही तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही हा हल्ला विसरणारही नाही. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि याचा हिशेब चुकता करु,’ असे बायडेन म्हणालेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम