अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे. दिल्ली येथील खाजगी रुग्णालयावर त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
केंद्रीय आराेग्य मंत्री हर्षवर्धन गाेयल यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच हाॅस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्याच्याही सूचना त्यांनी केल्या आहेत.
दिलीप गांधी यांना काेराेना संसर्गाचे निदान झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, अर्बन बॅंकेतील काही प्रकरणांमुळे गांधी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
त्यामुळे त्यांच्या आजारपणानिमित्त चर्चा सुरू झाली आहे. अर्बन बॅंकेतील चिल्लर आणि पिंपरी चिंचवड शाखेतील घाेटाळ्यामुळे गांधी यांच्याभाेवती अडचणी वाढल्या आहेत.
चिल्लर घाेटाळ्यात नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने अर्बनमधील काही अधिकाऱ्यांना अटक केली. तर गांधी यांच्यासह माजी संचालकांना नाेटीस बजावल्या आहेत.
यात फक्त एकाच संचालकाने नाेटिशीला सकारात्मक प्रतिसाद देत चाैकशीसाठी पाेलिसांसमाेर हजर राहिले. बाकीचे अजून समाेर आलेले नाही. याशिवाय पिंपरी चिंचवड शाखेतील घाेटळ्यात पाेलिसांनी चाैकशीचा फास आवळला आहे.
आतापर्यंत पाच जणांना बेड्या ठाेकल्या आहेत. गांधी यांना काेराेना संसर्गाचे वृत्त येताच अर्बन बॅंक बचाव कृती समितीचे सदस्य तथा कामगार कार्यकर्ते बहिरनाथ वाकळे यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी ट्विट केले.
अर्बन बॅंकेतील घाेटाळ्याप्रकरणात अटक हाेण्याच्या भितीने गांधी हे दिल्ली येथे आश्रयाला आले की काय? त्यांना लवकर नगरला पाठवून द्या, असे वाकळे यांनी त्यात म्हटले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|