India News: भारताने पाकिस्तानविरूद्धचे कागिरलमधील युद्ध जिंकले, त्याला आज २३ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी आपण हा कारगिल विजय दिवस साजरा करतो.
तसेच युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रदधांजली अपर्ण करतो. मात्र काळाच्या ओघात हे युद्ध नेमके कसे लढले गेले, याचे विस्मरण होता कामा नये. त्यासाठी या युद्धातील काही ठळक घडामोडी.भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आतापर्यंत चार निर्णायक युद्ध झाली.

या चारही युद्धात भारताने पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला. यातील सर्वात शेवटचे म्हणजे आणि सर्वात उंचीवर लढले गेलेले कारगिल युद्ध. १९९९ मध्ये प्रतिकुल परिस्थितीत हे युद्ध भारतीय २६ जुलै रोजी जिंकले. जवळपास ६० दिवस हे युद्ध चालले. अतिशय प्रतिकुल परिस्थीतीत भारतीय जवानांनी हे युद्ध लढत शत्रुला पाणी पाजले होते. या युद्धाला आज २३ वर्ष पूर्ण होत आहेत.
काही ठळक मुद्दे
जगात सर्वात उंचीवर लढलेले गेलेले हे एकमेव युद्ध.
कारगिल हा भाग समुद्रसपाटीपासून १३ ते १८ हजार फूट उंचीवर आहे. उणे ३० ते उणे ४० अंश सेल्सियस तापमान
टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरले.
भारताने सर्वात पहिल्यांना या युद्धात लेझर गायडेट बॉम्बचा वापर केला.
२६ मे रोजी भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले.
श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.
तणाव कमी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी लाहोर बस यात्रा सुरू केली
या युद्धात भारतीय लष्कराचे ५४३ अधिकारी आणि जवान शहीद झाले.
१० जून रोजी पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले.
२६ जुलै रोजी भारताने पाकिस्तानच्या शेवटच्या सैन्याला मारत कारगिलवर तिरंगा फडकवत हे युद्ध जिंकले.