अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यामुळे कर्जतचे नाव एका विशिष्ट उंचीवर पोहचले असून भविष्यात आणखी मोठे उद्दिष्ट आपण गाठाल, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याला पुणे येथील युवा उद्योजक राहुल मांढरे यांनी एक चारचाकी वाहन दिले, हे वाहन सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याला सुपूर्द करताना आमदार पवार बोलत होते.
यावेळी युवा उद्योजक राहुल मांढरे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, निवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल, सामाजिक संघटनेचे सदस्य उपस्थित होते. आमदार पवार म्हणाले,
सर्व सामाजिक संघटना गेल्या २९४ दिवसांपासून कर्जत शहर आणि परिसरात श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता, वृक्षारोपणासह पर्यावरणासाठी काम केले. याचे फलित म्हणून राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानात
राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून कर्जतची राज्यात एक वेगळी ओळख निर्माण केली. यात नगरपंचायतला दोन कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले असून एक कोटी रुपये नगरपंचायतला वर्ग झाले. आपल्या कार्यामुळे उद्योजक राहुल मांढरे यांनी आपल्याला कार्याला जे वाहन दिले, हा स्तुत्य उपक्रम आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम