अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. यातच बाधितांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने आता काही ठिकाणी कोविड सेंटर देखील पुन्हा बंद करण्यात येऊ लागले आहे.
यातच जिल्ह्यात सध्या कोरोनामुक्त गाव मोहीम राबवण्यात येत आहे. याला चांगला प्रतिसाद ग्रामीण पातळीवर मिळतो आहे. नुकतेच राहाता तालुक्यात 17 गावांनी करोनावर यशस्वी मात केली आहे, अशी माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात हाहाकार केला होता. जिल्ह्यात दरदिवशी आढळून येणाऱ्या बाधितांची संख्या साडेचार हजार पार गेली होती मात्र आता यावर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. यातच राहता तालुक्यातून दिलासादायक माहिती समोर आली आहे.
राहाता तालुक्यात 17 गावांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तालुक्यात चोळकेवाडी, तरकसवाडी, चंद्रापूर, कनकुरी, वाळकी, केलवड खुर्द, खडकेवाके, आडगाव खुर्द, बाबळेश्वर खुर्द, निमगाव, सावळविहीर,
येलमवाडी, चांगदेवनगर, नांदुर खुर्द, रामपुरवाडी, हनुमंतगाव, पिंपरी लोकाई या 17 गावांमध्ये 2 जून रोजी एकही करोना बाधित रुग्ण नसल्यामुळे या गावांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम