Samsung Galaxy M14 5G : स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने आपला आणखी एक शानदार स्मार्टफोन लाँच केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा 5G स्मार्टफोन आहे. कंपनीने आज आपला Samsung Galaxy M14 5G लाँच केला आहे.
नवीन फोनला 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस PLS LCD डिस्प्ले मिळत आहे. जर तुम्हाला हा स्मार्टफोन विकत घायचा असेल तर तुम्हाला काही काळ वाट पहावी लागणार आहे. कारण हा स्मार्टफोन युक्रेनमध्ये लाँच झाला आहे. हा फोन भारतात कधी लाँच होईल हे अजूनही कंपनीने जाहीर केले नाही.
किती आहे किंमत
कंपनीचा Samsung Galaxy M14 5G हा सध्या युक्रेनमध्ये लॉन्च झाला असून लवकरच हा फोन भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. फोन दोन स्टोरेज प्रकारांमध्ये येतो, 4GB RAM सह 64GB स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत UAH 8,299 (अंदाजे रु. 18,300) आणि 4GB RAM सह 128GB स्टोरेज स्मार्टफोनची किंमत UAH 8,999 (अंदाजे रु. 20,000) आहे. अजूनही कंपनीकडून हा फोन भारतात आणि इतर देशांमध्ये लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली नाही.
पहा स्पेसिफिकेशन
Samsung च्या या नवीन फोनला 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस PLS LCD डिस्प्ले मिळतो, जो (2408X1080 पिक्सेल) रिझोल्यूशनसह येतो. ऑक्टा-कोर Exynos 1330 प्रोसेसर आणि 4 GB RAM सह फोन 128 GB पर्यंत स्टोरेज मिळतो. या फोनमध्ये Android 13 आधारित One UI उपलब्ध आहे.
कसा असेल कॅमेरा
Galaxy M14 5G च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये ट्रिपल-रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यात प्राइमरी कॅमेरा 50-मेगापिक्सल f/1.8 अपर्चर सह येतो. दुय्यम कॅमेरा 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे तर तिसरा सेन्सर 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Samsung Galaxy M14 5G ची बॅटरी
स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी असून जी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे लक्षात घ्या की हा फोन बॉक्समध्ये चार्जरसह येत नाही. स्मार्टफोनच्या बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.