अहमदनगरसह राज्यात केरळचा लसीकरण पॅटर्न राबविण्यात यावा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-कोरोनाच्या लसीकरणावरून राज्यात गोंधळ उडाला आहे. यामुळे नुकतेच राज्यतील 18 ते 44 वर्षवयोगटातील लसीकरण बंद करण्यात आले आहे.

मात्र हे सर्व सुरु असताना केरळ राज्यातील लसीकरणाचा पॅटर्न हा देशात चर्चेचा विषय बनतो आहे. कोरोनावरील लसीकरणाचे काम केरळ राज्यात नियोजनबद्ध सुरू असून, एकही लस वाया गेलेली नाही.

अहमदनगरसह राज्यात केरळचा लसीकरण पॅटर्न राबविण्यात यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहचिव कॉम्रेड सुभाष लांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली.

दरम्यान मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोनाच्या संकट काळात मोफत वीज, पाणी आणि प्रत्येक कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचा घरपोहोच पुरवठा केला जात आहे.

त्यामुळे केरळ राज्याचा पॅटर्न प्रभावी ठरत असून, हा पॅटर्न अहमदनगरसह राज्यात राबविण्यात यावा, अशी मागणी लांडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

लसीकरणाचा योग्य नियोजन :- कोरोनावरील लसीकरणातही केरळ राज्याने आघाडी घेतली आहे. केंद्र सरकारकडून केरळ राज्यासाठी ७३ लाख ३८ हजार ८०६ लसीचे डोस उपलब्ध झाले.

मात्र, तेथील आरोग्ययंत्रणेने एकही डोस वाया न घालविता ७४ लाख २६ हजार १६८ नागिरकांना लस दिली. याचा अर्थ तेथील यंत्रणेने अतिरिक्त ८७ हजार ३५८ नागरिकांना लस दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe