अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी मोठ्या जल्लोषात सरपंचपदाची निवडी देखील पार पडल्या.
नुकतेच श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणार्या चांदेगाव ग्रामपंचायतीत चंद्रेश्वर महाविकास आघाडीचे दत्तात्रय नागेश खर्डे यांची सरपंचपदी तर सौ. वैशाली पुजाराम माळवदे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे.
चांदेगाव ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक सौ. मनिषा तोडमल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. सरपंचपदासाठी दत्तात्रय नागेश खर्डे यांचा तसेच उपसरपंच पदासाठी सौ. वैशाली पुंजाराम माळवदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चांदेगाव ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत चंद्रेश्वर महाविकास आघाडीला सहा तर चंद्रेश्वर तरुण मित्रमंडळाचे 3 उमेदवार निवडून आलेले आहेत.
निवडणूक प्रक्रियेच्या वेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री. मधुकर भागवत शिंदे, बाळासाहेब बर्डे, सौ. सुनिता सुरेश कोतकर, सौ. सुनिता नामदेव, सौ प्रमिला बाबासाहेब भांड, सौ. जया किशोर गायकवाड, नवनाथ गणपत वारघडे उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reservedp