अपहरण करणाऱ्यांचा अटकपूर्व जामीन रद्द

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- निघोज ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीअगोदर दोन सदस्यांच्या अपहरण प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन खेड न्यायालयाने रद्द केला. या आरोपींना तात्पुरता जामीन देण्यात आला होता.

ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ व मंगेश वराळ यांना उच्च न्यायालयाने यापूर्वीच अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सदस्य दिगंबर लाळगे व गणेश कवाद यांचे २० ते २५ जणांच्या टोळक्याने खेड परिसरातून अपहरण केले.

सुटकेनंतर त्यांनी जबाबात विरोधी गटाने अपहरण केल्याचे म्हटले होते. पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची गरज असल्याने जामीन रद्द करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली.

विठ्ठल कवाद यांनी दिलेल्या फिर्यादीत सुनील वराळ, नीलेश घोडे, अजय वराळ, धोंडीबा जाधव, राहूल वराळ व इतर १५ आरोपी आहेत.

आरोपींच्या वतीने वकील संकेत ठाणगे यांनी आरोपींना राजकीय द्वेषातून गुंतवल्याचा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने तो अमान्य केला.गुन्ह्यात वापरलेली वाहने, हत्यारे ताब्यात घेण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला.