ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मागणीसाठी किरण काळेंचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह मनपात रात्रभर मुक्काम

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- काँग्रेसच्या ऑक्सीजन बेडच्या मागणीसाठी उत्तर नसणारे मनपा आयुक्त शंकर गोरे काल रात्री उशिरापर्यंत अखेर स्वतःच्याच कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत.

शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि पदाधिकारी यांनी देखील चिकाटी सोडली नाही. रात्री सुमारे नऊ वाजेपर्यंत मनपाचे उपायुक्त यशवंत डांगे आणि तोफखाना पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा हा किरण काळे

यांची आंदोलन मागे घेण्यासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र नगरकरांची मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही मनपा सोडणार नाही अशी परखड भूमिका काळे यांनी घेतल्यामुळे डांगे यांना आवरते घ्यावे लागेल.

मनपाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असे घडले की कोणत्या तरी नेत्याने रात्रभर चक्क आयुक्तांच्याच दालनासमोर चटई अंथरूण मुक्काम करत आपल्या सहकाऱ्यांसह नगरकरांच्या प्रश्नावर आंदोलन केले आहे. काळे यांच्या भूमिकेमुळे रात्री पासून मनपाच्या आवारात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

जनसामान्यांच्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस आणि किरण काळे धावून आल्यामुळे मनपा प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे. किरण काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा,

विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते या आंदोलकांनी मनपामध्ये नगरकरांसाठी मुक्काम ठोकत रात्रभर आंदोलन सुरूच ठेवले आहे. आंदोलकांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुणी झोपण्यासाठी चटई,

पांघरून आणून दिले तर कोणी स्वतःच्या घरून आंदोलकांना जेवणाचे डबे, पिण्याचे पाणी आणून दिले. रात्री उशिरा किरण काळे आणि आंदोलकांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने ऑक्सीजन, व्हेंटिलेटर बेडच्या उपलब्धतेसाठी उभारलेल्या लढ्याबद्दल नगरकरांशी संवाद साधला.

शहराचे आ.संग्राम जगताप यांचे नाव न घेता शहरातील परिस्थितीला तेच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले.

तसेच आंदोलकांना देण्यासाठी कोणतेच ठोस उत्तर आपल्याकडे नसल्यामुळेच आणि आमदारांच्या दबावामुळेच दिवसभर स्वतःच्याच कार्यालयाकडे फिरकण्याची हिम्मत न करू शकलेले मनपा आयुक्त स्वतः येत ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत हा लढा नगरकरांसाठी सुरूच राहील असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!