अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-लहान मुलांसाठी कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक ठरत आहे. डबल म्यूटेंट विषाणू धोकादायक आहे.
आपण विचार करत असाल लोकांना का कोरोना विषाणूची लागण होत आहे. हा डबल म्यूटेंट नावाचा काय व्हायरस आहे. देशात कोरोना संसर्गाचा अचानक उद्रेक पाहायला मिळाला. आता अनेक राज्यांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती बनली आहे.
त्याचे कारण कोरोनाचा नवीन स्ट्रेन आहे. स्ट्रेनचा अत्यंत वेगाने प्रसार होत आहे. कोणत्याही विषाणूमध्ये बदल होतात आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. समजा कोरोना विषाणू एका बॉलसारखा गोल झाला आहे आणि ज्यावर हे काटे आहेत.
त्यांना स्पाइक्स असे म्हणतात, ज्यात अनुवांशिक सामग्री असते. अनुवांशिक सामग्री याचा अर्थ विषाणूचे डीएनए ( DNA) किंवा आरएनए ( RNA) काय आहे. कोरोना ही विषाणूची अनुवांशिक सामग्री आरएनए ( RNA)आहे.
आपल्याला हे सर्व अगदी गुंतागुंतीचे वाटेल. परंतु RNA हा या विषाणूचा मुख्य पत्ता आहे. आता आव्हान आहे की, व्हायरसच्या घराचा हा पत्ता सतत बदलत राहतो. म्हणजेच, व्हायरसमध्ये वारंवार बदल होत असतात आणि याला म्यूटेशन म्हणतात.
जेव्हा विषाणूचा घराचा पत्ता बदलतो, म्हणजेच तो बदलत राहतो, बहुतेवेळा हे नवीन स्ट्रेन नवरुप धारण करतो आणि स्वतःची ओळख तयार करतो. आम्ही याला नवीन प्रकार किंवा नवीन स्ट्रेन म्हणतो आणि त्यातून Double Mutant Virus तयार होतो.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, दोन वेगवेगळ्या स्ट्रेनचे विषाणू मिळून तिसरा विषाणू तयार झाल्यास त्याला Double Mutant स्ट्रेन असं म्हणतात. Double Mutant जे भारतातील डॉक्टर आणि वैज्ञानिकांसाठी एक आव्हान बनले आहे, ते दोन स्ट्रेनपासून बनलेले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|