अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- २१ जूनपासून देशात सर्वांचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित करताना केली होती.
यातच आता कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या लसींचे कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत. जाणून घ्या काय असणार दर खासगी रुग्णाल कोविशिल्ड या लसीचा प्रति डोसा ७८० रूपयांना मिळणार आहे.
याममध्ये ६०० रूपये लसीची किंमत + ५ टक्के जीएस आणि १५० रूपयांचे सेवा शुल्क सामील आहे. तर कोवॅक्सिन ही लस १४१० रूपयांना मिळणार असून यामध्ये (१२०० रूपये मूळ किंमत+६० रूपये जीएसटी आमि १५० रूपयांचे सेवा शुल्क सामील आहे.
तर खासगी रुग्णालयात स्पुटनिक व्ही ही लस ११४५ रूपये प्रति डोस दरानं देण्यात येईल. लसीच्या दर ठरवण्यासोबतच दररोज यावर देखरेखही ठेवली जाणार आहे.
अधिक रक्कम घेतल्या संबंधित कोविड लसीकरण केंद्रावर कारवाई केली जाईल. रुग्णालयांना १५० रूपयांपेक्षा अधिक सेवा शुल्क आकारता येणार नाही असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम