कोपरगाव तालुक्याला पुरेसे रेमडेसिवीर मिळावेत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता त्याप्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

कोपरगाव तालुक्यासाठी रुग्णसंख्येच्या तुलनेत पुरेसे इंजेक्शन मिळावे व कोपरगाव तालुक्याच्या बाबतीत अन्याय होऊ नये,

अशी मागणी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी जिल्ह्याचे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांच्याकडे केली आहे. कोपरगाव तालुक्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडत आहे.

उपलब्ध कोविड सेंटरमध्ये असलेल्या बेडची संख्येची कमतरता असून कोपरगाव तालुक्यासाठी पुरवण्यात येणारी रेमडेसिविर इंजेक्शनची संख्याही रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात मिळत आहे.

सध्या शहरातील सर्वच कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांसाठी रेमडेसिविरची मागणी होत आहे. इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांच्यावर इंजेक्शन शोधण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली.

रेमडेसिविर इंजेक्शन करिता नेमणूक असलेले नोडल अधिकारी तथा सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम व अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त कातकडे यांची भेट घेत

कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्याला रुग्णसंख्येच्या तुलनेत रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होत नसून कोपरगाव तालुका हा जिल्हा आकडेवारीत प्रथम पाच तालुक्यांच्या यादीत असल्याने त्या तुलनेत रेमडेसिविर इंजेक्शन मिळावे,

असे निदर्शनास आणून देत तालुक्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठा करण्याची मागणी केली. त्यानुसार कदम व कातकडे यांनी कोपरगावसाठी रेमडेसिविरचा पुरवठा करण्याचे आश्वसन दिले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe