अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे एका महिन्यात (एप्रिल) सात व्यक्तीचा मृत्यू, कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे.
रूग्ण संख्या किती आहे कळत नाही कारण ग्रामस्थ तपासणीच करत नाहीत. गावात दोन दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मोफत कोरोना तपासणी कॅम्प लावला, खरवंडी गावची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास फक्त ६२ ग्रामस्थांनी तपासणी केली.
मात्र जास्त त्रास झाल्यावर उपचारासाठी रूणालयात दाखल होतात.कोरोनामुळे खरवंडी कासार येथील वाढती मृत्यू संख्या आलेख पाहता परिस्थिती अतीशय गंभीर आहे. तहसीलदार, प्रांत अधिकारी, पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
खरवंडी कासार येथे अशा महामारीत व्यावसायीक वर्ग दुकान बंद करून दारासमोर बसून ग्राहकसेवा करत आहे. पैशाच्या हव्यासापायी कोरोनाला आमंत्रण देत रूग्ण संख्या वाढवत आहेत.ग्रामस्थरावर ग्रामविकास अधिकारी,
ग्रामपंचायत कर्मचारी, दक्षता कमिटी यांनी विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली.मात्र त्यांना उर्मट भाषेत प्रतिसाद मिळाला पोलिस अधिकारी समवेत असते तर लाठी भाषेत समज मिळाली असती जेणेकरुण दंड न घेता लाठी दंड मिळाला असता.
आता पोलीस प्रशासन समवेत घेत लाठी, दंडपण आता दुसरा पर्यांय नाही असे मत खरवंडी कासार ग्रामविकास अधिकारी अशोक दहीफळे यांनी व्यक्त केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|