अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने बाधित रुग्णांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासन दिवस रात्र प्रयत्न करीत असतांना एकीकडे कोरोनावर मात करून बरे होणा-यांची संख्या वाढत असून, दुसरीकडे मात्र दुर्दैवाने मृत्यू दर देखील वाढत आहे.
या दरम्यान श्रीरामपूर शहरातील एका कोविड रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे, ज्यात सायंकाळीच्या सुमार, कोरोना उपचारा दरम्यान एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली, जेव्हा या संदर्भात मयताच्या कुटुंबाला माहिती दिली असता.
मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी, रुग्णालयात बळजबरीने घुसून त्याठिकाणी असलेल्या डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की तसेच तोडफोड करून कोरोना बाधित मृतदेह पळवून नेला आहे.
या संदर्भात रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने, त्वरित वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना माहिती दिली, त्यानंतर महसूल,पालिका व पोलीस प्रशासनाने, रुग्णालयातुन पळवून नेण्यात आलेल्या मृतदेह शोध सुरू केला,
या घटनेस बराच कालावधी उलटून देखील, मृतदेह प्रशासनाच्या ताब्यात आला नसल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. या धक्कादायक घटनेने कोविड रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्माची धास्तावले आहेत.
संबधित कोरोना बाधित मयत व्यक्तीचा मृतदेह बळजबरीने घेऊन गेले. सदर व्यक्ती कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती इतर नातेवाईक व परिसरातील नागरिकांना न दिल्याने अंत्यविधीस मोठा जनसमुदाय जमल्यास त्यांना देखील कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आता संबंधित अधिकारी काय ठोस भूमिका घेताय हे पाहणे महत्वाचे ठरेल.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|