अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील २६ गावांना जोडणारे आश्वी सर्कल येथे शासनाने तातडीने कोरोनाच्या महामारीत रुग्णा आधार देण्यासाठी कोविड रुग्णालय उभारावे,
अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भारत गिते यांनी पत्रकान्वये माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे यांच्याकडे केली आहे.
गिते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सध्या कोरोना महामारीत आश्वी परिसरातल्या २६ गावांत रोज मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण सापडतात मात्र आश्वीत श्वाश्वत उपचार पद्धती नसल्यामुळे रुग्नांना संगमनेर ,लोणी अथवा नगर येथे जावे लागते.
काहीना खाजगी रुग्णाल्यात मोठा आर्थिक फटका बसतो आहे. गोरगरिब पैश्या अभावी जुजबी उपचार घेऊन घरी राहतात. त्यामुळे परिसरात कोरोनाचा मोठा धोका होऊ शकतो. आश्वी खुर्द व निमगावजाळी येथील जि.प प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांचा कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे मोठा गोंधळ होत आहे.
तसेच कोरोना चाचणीसाठी आलेल्या रूग्णांची स्वतंत्र सोय नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांची प्रमाण वाढ होते. चाचणीचा अहवाल येण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात. त्यामुळे शासनाने आश्वी येथे तातडीने सर्व सुख सोयी नियुक्त कोविड रुग्णालय सुरु करावे,अशी मागणी परिसरातून होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी आ. विखे पाटलांना भेटून मागणी केली आहे.
तसेच याबाबतचे पत्र आरोग्य मंत्री व जिल्हाधिकारी यांना ई मेलद्वारे पाठवले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दूभावामुळे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील बहुतांश गावामध्ये ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून व लोकांच्या मागणी नूसार आजपासून (शुक्रवार) ते सोमवार पर्यत चार दिवस जनता कफ्र्यू आयोजन करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीसह पोलीस , महसूल, आरोग्य यंत्रणा खबरदारी घेत गावा गावात लोकांना सतर्कतेचा इशारा देत आहे. मास्क,सॅनिटाईझर वापरुन, विनाकारण फिरणे टाळण्याचा इशारा देण्यात येत आहे. आश्वी बु , पानोडी , शिबलापूर , पिंप्री लौकी अजमपुर , दाढ , मालुंजे , शेडगाव , झरेकाठी , खळी , डिग्रस , अंभोरे, उंबरी बाळापूर , कनोली , मनोली , पिंपरणे ,
आश्वी खुर्द , ओझर , चणेगाव , प्रतापपूर , चिंचपूर , सादतपूर , निमगाव जाळी आदी गावामध्ये आरोग्य तपासणी करण्यासाठी पाच टीम तयार करण्यात आल्या असून यामध्ये प्रत्येक कुटुंबाची आरोग्याविषयक माहिती देण्यात येत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|