अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-राज्यातील जनतेला आरोग्य सेवा न मिळणे हे सरकारचे मोठे अपयश आहे. औषधांचा काळाबाजार होतोय. ऑक्सीजनचा तुटवडा आहे.
माणसं मरतायेत, सरकारला राजकारणापलीकडे काही दिसत नाही. विरोधी पक्षाने सरकारवर टिका करण्याऐवजी सरकारच विरोधी पक्षावर टिका करण्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिलीच वेळ असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
आगसखांड येथे पंचायत समितीच्या सभापती सुनिता दौंड व भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी स्वखर्चातुन दिपाली प्रतिष्ठाणच्या वतीने सुरु केलेल्या ३०० बेडच्या स्व.गोपिनाथ मुंडे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राजळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रातांधिकारी देवदत्त केकाण, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे, अमोल गर्जे, बालाजी पोंधे, एकनाथ आटकर, रणजित बेळगे, नारायण काकडे,
अर्जुन धायतडक उपस्थित होते.यावेळी बोलताना राजळे म्हणाल्या, कोरोनाची गंभीर परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा यांना पुर्ण अपयश आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे.
हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सीजन न मिळणे, रेमडिसिव्हीर औषधाचा काळाबाजार, हॉस्पिटलमध्ये होणारी पेशंटची आर्थिक लुट हे दुर्दैवी आहे.
पाथर्डी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये रेमडिसिव्हीअर औषध देण्यासाठी पात्रताधारक वैद्यकीय अधिकारी मिळत नाही. कोराना लस मिळत नाही.
शेवगाव पाथर्डी मतदार संघामध्ये मिळालेल्या कोराना निधीचा वापर याठिकाणी कमी पडणाऱ्या औषधोपचार तसेच ऑक्सीजन व्हेटीलेटरसाठी करुन कायमस्वरुपीची वैद्यकीय सुविधा कशी देता येईल यासाठी करणार आहे. गोकुळ दौंड यांनी आभार मानले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर