अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-वर्षभरासाठी जिल्हा परिषदेच्या सुरक्षेवर मोठा निधी खर्च करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारत आणि लालटाकी याठिकाणी असणार्या पदाधिकारी,
अधिकारी यांच्या निवासस्थानावर नेमणुकीस असणार्या सुरक्षा रक्षकांच्या मानधनापोटी वार्षिक 66 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत व लालटाकी येथील अधिकारी, पदाधिकार्यांची निवासस्थाने यासाठी माजी सैनिक महामंडळाच्या वतीने 15 सुरक्षारक्षक व एक सुपरवायझर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
हे सर्व जण तीन शिफ्टमध्ये सेवा बजावतात. 31 मार्च 2021 अखेर या सुरक्षारक्षकांच्या सेवा कंत्राटाची मुदत संपली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या कंत्राटाला मुदतवाढ देण्याबाबतचा विषय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला होता.
त्याला मंजुरी देण्यात आली. 1 एप्रिल ते 31 मार्च अशी वर्षभराच्या कालावधीसाठी या सुरक्षारक्षकांची नेमणूक माजी सैनिक महामंडळाच्या वतीने करण्यात येते.
मागील वर्षी या सुरक्षारक्षकांच्या मानधनाकोटी वार्षिक 60 लाख 30 हजार रुपये तरतूद करण्यात आली होती, मात्र 2021-22 या आर्थिक वर्षात महागाई भत्ता विचारात घेता 66 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|