अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-चारा घोटाळ्यात शिक्षा भाेगणारे राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
त्यांना एक लाख रुपयांचा वैयक्तिक जात मुचलका व १० लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. बेल बाँड भरल्यानंतर एक-दोन दिवसांत ते बाहेर पडू शकतील.
लालूंना सव्वा तीन वर्षानंतर जामीन मिळाला आहे. चारा घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात लालू २३ डिसेंबर २०१७ रोजी तुरुंगात गेले होते.
न्यायालयाने लालूंसमोर दोन शर्ती ठेवल्या. जामीनावर असतानाच्या काळात उच्च न्यायालयाच्या परवानगीविना त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही. ते आपला मोबाईल क्रमांक व पत्ता बदलू शकणार नाहीत.
महसुली प्रकरणात निम्मी शिक्षा पूर्ण केल्यानंतरच कोर्टाने त्यांना जामीन दिला. त्यांना जामीन मिळाल्याचा आनंद आहे. परंतु प्रकृतीबाबत चिंता वाटते, असे तेजस्वी यांनी म्हटले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|