अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी आम्ही सेल्समन असून सोन्याचे दागिने व देव पॉलिश करून देतो असे सांगत. शिर्डीलगतच असलेल्या सावळीविहीर येथील एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक केली आहे.
विद्या शशांक मालसे (वय ६३) असे त्या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मालसे या घरी असताना ११ वाजेच्या सुमारास दोन अनोळखी इसम दुचाकीवरून आले.
आम्ही सेल्समन असून दागिने व देवाच्या मूर्तीला पॉलिश करून देतो, असे म्हणत घरातील काही चांदीचे देव पॉलिश करण्यासाठी दिले असता त्यांनी ते पॉलिश करून दिले.
त्यांनी या वस्तू कुकरमध्ये हळदीच्या पाण्यात टाकल्या व मला दिल्या. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र, १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व किरकोळ दागिने उजळून देण्यासाठी कुकरमध्ये टाकले असता माझे लक्ष विचलित करून हे दोन तरुण पळून गेले.
त्यानंतर मी कुकर तपासला असता त्यात दागिने नसल्याचे लक्षात आले. यात ३ लाख २४ हजारांची फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. यावरून शिर्डी पोलिसांनी अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम