‘डॅडी’ची दगळी चाळ करणार जमिनदोस्त

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचे मुंबईतील निवास्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दगडी चाळ जमिनदोस्त करण्यात येणर आहे.

प्राथमिक योजनेनुसार दगडी चाळीच्या जागी ४० मजली दोन टॉवर उभारण्यात येणार आहेत. यामध्ये मूळ भाडेकरुंसाठी घरं असतील आणि उर्वरित घरं विक्रीसाठी उपलब्ध असतील. दगडी चाळीत एकूण ३३८ भाडेकरु असून अरुण गवळी संपत्तीचा मालक आहे.

अरुण गवळीने पुनर्विकासाठी म्हाडाकडे प्रस्ताव पाठवला होता. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर म्हाडाकडून प्रस्ताव मंजूर करण्यात आला. म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्विकास मंडळ अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी ही माहिती दिली.

दगडी चाळमधील सर्व १० इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. यामधील आठ इमारती अरुण गवळीच्या मालकीच्या असून इतर दोन इमारतीही त्याच्या कुटुंबाने विकत घेतल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. “पुनर्विकासासाठी लवकरच बिल्डरला ना हरकत प्रमाणपत्र दिलं जाईल.

दरम्यान भाडेकरुंसाठी इरादा पत्र मंजूर झालं आहे. त्याआधी एमबीआरआरबी पात्र भाडेकरुंची यादी तयार करणार आहे,” असंही घोसाळकर यांनी सांगितलं आहे. सध्या एमबीआरआरबीला या प्रकल्पात किती घऱं मिळतील हे निश्चित नाही.

इरादा पत्र हे फक्त पहिलं पाऊल आहे. नंतर यामध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे,” असं घोसाळकर यांनी सांगितलं आहे. १० इमारतींमध्ये प्रत्येकी चार मजले असून यामधील दोन इमारती धोकादायक असल्याने आधीच पाडण्यात आल्या आहेत.

यामुळे प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत त्या मोकळ्या जागेत भाडेकरुंसाठी तात्पुरती राहण्याची सोय केली जाईल. अरुण गवळीमुळे दगडी चाळ प्रसिद्ध असून शिवेसना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी सध्या तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याला नागपूर जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe