स्टेशन रोडवरील पथदिव्यांसाठी धरणे आंदोलन करुन शिव राष्ट्र सेनेच्यावतीने कंदिल भेट

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- स्टेशन रोड परिसरातील रविश कॉलनी ते रेल्वे स्टेशन परिसरात लाईट नसल्याने या परिसरात अंधाराचे सामराज्य निर्माण झाले आहे.

त्यामुळे या भागात प्रवाशांना लुटण्याचा प्रकार वाढत आहे. चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे, छोट-मोठे वाहनांचे अपघात होता याबाबत मनपा आयुक्त मा श्री शंकर गोरे साहेब यांना शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने तीन महिन्या पुर्वी निवेदन देण्यात आल होते.

परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याच्या निषेधनार्थ शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने आज महानगरपालिकेत धरणे आंदोलन करुन उपायुक्तांना कंदील भेट देण्यात आला. याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, दलित आघाडी जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अनिल शेकटकर,

ओबिसी अध्यक्ष बाबासाहेब करपे, शेतकरी संघटनेचे भैरवनाथ खंडागळे, शहराध्यक्ष अरूण खिची, युवा प्रमुख शंभु नवसुपे, दत्तात्रय शेडाळे, बाळासाहेब जाधव, जालिंदर कुलट, ऋषी शिंदे, विवेक डबल अनु साळवे, रजनीकांत आढाव, धना बडे आदी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष श्री अक्षय कांबळे यांनी सांगितले की, स्टेशनरोड व केडगांव परिसरातील पथदिवे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याबाबत तीन महिन्यापुर्वी मनपा आयुक्तांसह इलेक्ट्रिक विभागास पथदिवे बंद असल्याबाबतचे निवेदन देऊन आंदोलनाचा इशरा देण्यात आला होता.

परंतु तीन महिन्यात कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने आज पक्षाच्यावतीने आंदोलन करुन कंदील भेट देण्यात आले, आतातरी काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन सुरू असताना उपायुक्त यशवंत डांगे व अभियंता म्हेत्रे यांनी आंदोलकांंना आपल्या दालनात बोलावून चर्चा केली.

यावेळी शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने प्रशासनाला कंदिल भेट देण्यात आला. यानंतर उपायुक्त डांगे साहेब यांनी शिव राष्ट्र सेना पक्षाच्या पदाधिकारी यांना सदर काम तातडीने मार्गी लावण्याचे लेखी पत्राद्वारे आश्‍वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News