Laptop Under 30000 : कोरोनाच्या (Corona) काळापासून स्मार्टफोनसह (smartphones) लॅपटॉपची (laptops) मागणीही झपाट्याने वाढली आहे.
घरून काम करण्यापासून (work from home) मुलांच्या ऑनलाइन अभ्यासापर्यंत (online study) लॅपटॉपची गरज आहे. अशा स्थितीत केवळ महागडे लॅपटॉपच विकत घेणे आवश्यक नाही, आजकाल बाजारात चांगले स्पेसिफिकेशन आणि वेगवान प्रोसेसर असलेले लॅपटॉप कमी किमतीत उपलब्ध आहेत.
तुम्हीही कमी किमतीत फास्ट प्रोसेसर आणि लांबलचक बॅटरी असलेला लॅपटॉप शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या रिपोर्टमध्ये, आम्ही तुम्हाला 30000 रुपयांच्या आत सर्वोत्तम SSD स्टोरेज लॅपटॉप बद्दल सांगणार आहोत.
Infinix X1 Slim XL21
Infinix X1 Slim XL21 सिरीज लॅपटॉप हा 30 हजारांपेक्षा कमी किमतीत येणारा एक चांगला पर्याय आहे. या लॅपटॉपमध्ये 14-इंच फुल एचडी प्लस स्क्रीन आहे, जी 1920 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 300 निट्स ब्राइटनेसमध्ये उपलब्ध आहे.
लॅपटॉपला Intel Core i3 10th Gen प्रोसेसर आणि 8 GB LPDDR4X रॅमसह 256 GB SSD स्टोरेज मिळते. Infinix X1 Slim XL21 मध्ये Windows 11 सपोर्ट देखील देण्यात आला आहे. तसेच, लॅपटॉपमध्ये ड्युअल स्पीकर आणि 11 तासांपर्यंत बॅटरी बॅकअपसह स्लिम डिझाइन आहे. हा लॅपटॉप फ्लिपकार्टवरून (Flipkart) 29,990 रुपयांना खरेदी करता येईल.
ASUS VivoBook 14
Asus कडून येणारा हा लॅपटॉप स्टायलिश डिझाइनसह येतो. यात 15.6-इंच फुल एचडी प्लस स्क्रीन आहे, जी 1366 x 768 पिक्सेल रिझोल्यूशनसह येते. लॅपटॉपला ड्युअल कोर Ryzen 3 3250U प्रोसेसर आणि 8 GB LPDDR4X रॅमसह 256 GB SSD स्टोरेज मिळते.
लॅपटॉपमध्ये Windows 11 सपोर्ट आणि दीर्घ बॅटरी लाइफ दिसत आहे. लॅपटॉपचे वजन 1.80 किलो आहे. त्याची किंमत 32,990 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवरून डिस्काउंटनंतर 30 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
Acer One 14 Business Laptop
Acer’s One 14 हा देखील या किंमतीच्या टप्प्यावर एक टिकाऊ लॅपटॉप आहे. Acer One 14 Business लॅपटॉपमध्ये 14-इंचाची HD+ स्क्रीन आहे, जी 1366×768 पिक्सेल रिझोल्यूशनसह येते. यात AMD Ryzen 3 3250U प्रोसेसर आणि AMD Radeon ग्राफिक्स आहेत.
लॅपटॉपमध्ये Windows 11 सपोर्टसह 256 GB SSD स्टोरेज आणि 8 GB LPDDR4X रॅम आहे. यासोबतच सर्व आवश्यक पोर्ट्स ड्युअल इनबिल्ट माइकसह उपलब्ध आहेत. लॅपटॉप Amazon वरून 29,990 रुपयांना खरेदी करता येईल.
Redmi Book 15
स्मार्टफोन ब्रँड Redmi कडून येणारा Redmi Book 15 लॅपटॉप देखील या किमतीत एक उत्तम पर्याय असू शकतो. या लॅपटॉपमध्ये 15.6 इंच फुल एचडी प्लस स्क्रीनसह Intel Core I3 11th Gen प्रोसेसर आहे. लॅपटॉपमध्ये 8 GB LPDDR4X रॅमसह 256 GB SSD स्टोरेज आहे.
लॅपटॉपमध्ये Windows 11 सपोर्ट आहे आणि 10 तासांपर्यंत बॅटरी लाइफ आहे. लॅपटॉपचे वजन 1.8 किलो आहे. Redmi Book 15 ची किंमत 31,990 रुपये आहे, पण Amazon वर डिस्काउंट दिल्यानंतर 30 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.