अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांद्याची आवक झाली होती.
घोडेगाव येथील कांदा मार्केटला राज्यातील सर्वाधिक विक्रमी 65 हजार 655 गोण्या कांदा आवक एकाच दिवशी झाली आहे. दरम्यान कांद्याला भाव जास्तीत जास्त 2400 रुपयांपर्यंत निघाला. तसेच मोठ्या मालाला 1900 ते 2200 रुपये भाव मिंळाला.
मध्यम मोठ्या कांद्याला 1800 ते 1900 रुपये, मध्यम मालाला 1600 ते 1700 रुपये, गोल्टा/गोल्टी कांद्याला 1200 ते 1500 रुपये भाव मिळाला. एक दोन वक्कलला 2300 ते 2400 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला.
घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी 65 हजार 622 गोण्या आवक झाल्याने या आठवड्यातही कांद्याची मोठी आवक राहणार असल्याचे दिसून येते.
मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव येथे सुरू असलेल्या कांदा मार्केटमुळे घोडेगाव व परिसरातील अर्थकारणाला मोठी गती मिळाली.
छोटे मोठे हॉटेल व्यवसायिक, दुकानदार, कांदा बारदाना विक्रेते, हमाल, ट्रक चालक, टेम्पो चालक आदींना रोजगार उपलब्ध झाला. एकाच दिवसात राज्यात सर्वाधिक कांदा आवक होणारे घोडेगावचे कांदा मार्केट आता देशभरात प्रसिद्ध होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम