अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- संगमनेर तालुक्यात विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून यासाठी निधींची उपलब्धता होत आहे.
निळवंडे पाटाचे उजव्या व डाव्या कालव्याचे काम प्रगती पथावर आहे, असे प्रतिपादन थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केले. मांची फाटा ते आश्वी या ५ किमी रस्त्याचे भूमिपूजन शनिवारी त्यांच्या हस्ते झाले.
यावेळी आदिवासी महामंडळाचे उपायुक्त विकास पानसरे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, पं. स. सदस्य बेबी थोरात, रिपाइंचे नेते बाळासाहेब गायकवाड, महावितरणचे कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे,
बी. एम. पानसरे, माजी सभापती बाळासाहेब गायकवाड, कोंचीचे सरपंच अमृता भास्कर, उपसरपंच सोमनाथ जोंधळे, आश्वीचे सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड, पत्रकार गौतम गायकवाड, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब भालेराव,
गीताराम गायकवाड, अण्णा जऱ्हाड, सुरेश मदने, प्रवीण गायकवाड, सचिन उपाध्ये, अशोक गायकवाड, प्रशांत कोलपकर, कल्याणी डोंगरे, सविता डोंगरे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी विकास पानसरे, महेंद्र गोडगे, बाळासाहेब गायकवाड, राजाराम डोंगरे आदींची भाषणे झाली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम