स्व. दिलीप गांधी यांना श्रध्दांजली विकासाचा व्हिजन असलेला नेता हरपला…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:-  निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्या प्रसारक मंडळ, नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने माजी केंद्रीय राज्यमंत्री स्व. दिलीप गांधी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, गोकुळ जाधव, काशीनाथ पळसकर, अनिल डोंगरे, भरत फलके, निळकंठ वाघमारे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, तुकाराम खळदकर, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदीप डोंगरे, लहानबा जाधव आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे म्हणाले की, माजी केंद्रीय राज्यमंत्री गांधी अहमदनगर जिल्हा दक्षिण लोकसभेचे खासदार असताना अनेक विकासात्मक कामे मार्गी लावली. राजकीय हेवेदावे बाजूला ठेऊन त्यांनी विकासाला महत्त्व देऊन कार्य केले. त्यांच्या निधनाने विकासाचा व्हिजन असलेला नेता हरपला आहे.

गावात त्यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतंर्गत रस्त्याचे कामे मार्गी लावले. मातंग समाजासाठी समाज मंदिर उभे करुन शाळेसाठी संगणक देखील भेट दिले. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या विकासात्मक वाटचालीचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण मिळण्यासाठी व भौतिक सुविधा निर्माण करुन देण्यासाठी स्व. गांधी यांचा नेहमीच प्रयत्न राहिला. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या जाणीव ठेऊन त्यांनी गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्य केले. त्यांचे कार्य सर्वसमावेशक होते.

त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा नेता हरपल्याचे दु:ख होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीनाथ पळसकर यांनी केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe