अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असून दरदिवशी जिल्ह्यात बाधितांची भर पडत आहे. हे मोठे संकट असतानाच जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना देखील सुरूच आहे.
यामुळे पोलीस प्रशासन देखील चांगलेच चक्रावून गेले आहे. नुकतेच अशीच एक गुन्हेगारी स्वरूपाची घटना जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडली आहे.
पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याच्या कारणावरून एका जणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावल्याची घटना शहरातील चैतन्य नगर परिसरात घडली.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि, शहरातील प्रतिक शेटे याने धीरज पावडे, आकाश पावडे व निलेश काथे यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या कारणावरून निलेश काथे याने तलवार काढून वैष्णव राजकुमार मुर्तडक (वय 29, रा. चैतन्य नगर) याला दमबाजी केली.
याप्रसंगी तेथे उपस्थित असलेल्या प्रतिक शेटे यास इतर दोघांनी मारहाण केली. एकाने वैष्णव मुर्तडक यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून त्याला धमकी दिली.
याबाबत मुर्तडक याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|