शहरात कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; गावगुंडांकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातच दरदिवशी गुन्हेगारीच्या घटनांची नोंद देखील वाढ होत आहे.

शहरात सध्या गावगुंडांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र पोलीस प्रशासनच धाक उरलेला नसल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, २० मार्च रोजी विजय पठारे त्याचा भाऊ अजय पठारे व इतर आरोपींनी शहरातील बालिकाश्रम रोडवरील दोन दुकानांमध्ये घुसून लुटमार केली होती.

तसेच या दोघा भावांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आहे. त्यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात हल्ल्यात जखमी झालेला तरुण दिनेश मनोहर पंडित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय राजू पठारे याच्यासह संतोष नवगिरे,

गणेश सुरेश पठारे व एक अनोळखी आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलिसांनी नुकताच या टोळीविरोधात मोक्काचा प्रस्ताव सादर केला आहे.

सराईत गुंड वारंवार नागरिकांवर हल्ले करून दशहत निर्माण करत असताना पोलिसांना तो सापडत नसल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe