अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील निघोज येथेखाजगी सावकारी करणा-या एका विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गन्हा दाखल झाला होता.
निघोज गावात पोलिस ठाण्याच्या वतीने जाहीर दवंडी देऊन त्या सावकारच्या विरोधात कोणाची काही तक्रार असेल तर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, निघोज येथील नवनाथ लंके यांनी बाबाजी लंके यांच्याकडून जानेवारी 2017 मध्ये शेकडा पाच रूपये दराने पन्नास हजार रुपये व्याजाने घेतले होते. सलग वीस महिने दरमहा अडीच हजार रुपये व्याजापोटी देऊन परतफेड केली होती.
पुन्हा 2019 ला पन्नास हजार घेऊन अठरा महिने दरमहा अडीच हजार व्याज दिले. नंतर एकरकमी परतफेड करतो काही तरी सवलत द्या असे नवनाथ याने विनंती केली. मात्र, ती मान्य न झाल्याने पुढे नवनाथ यांनी पोलीसत फिर्याद दिली होती.
लंके यांच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात बेकायदा सावकारी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. लंके यांनी निघोज गावात तसेच परीसरातही अनखी कोणाला व्याजाने पैसे दिले आहेत का, याचा पोलीस तपास करीत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून निघोज गावात दवंडी देण्यात आली. अशा प्रकारे एखाद्या सावकाराविरोधात कोणाची तक्रार आहे का अशी दवंडी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रथमच दिली असावी.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम