अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केंद्राकडून निधी आणून इतिहासामध्ये नोंद होईल, असे उड्डानपूल, महामार्ग व इतर विकास कामे मार्गी लावली. आम्ही १०६ असून विरोधात बसलो परंतु कधी जाहिरात केली नाही.
आघाडीचे नेते मी किती साधा, समाजसेवक आणि खरा आहे, हे दाखवत उठता बसता सोशल मीडियावर जाहिरात करत जिल्हाभर फिरत असल्याची टीका खासदार सुजय विखे यांनी कोरडगाव येथे दत्तक घेतलेल्या सांसद आदर्श ग्राम योजना कोरडगावचे विकास कामांच्या आढावा घेताना केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अजय रक्ताटे, सरपंच विष्णू नाना देशमुख, चेअरमन नारायणराव काकडे, गटविकास अधिकारी शितल खिंडे,
गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, शिक्षणाधिकारी, नायब तहसीलदार पंकज नेवसे, मधुकर देशमुख आदी उपस्थित होते. राज्यात महाविकास आघाडी सरकारने राज्यात विकास, तर केला नाही.
परंतु कारोनासारख्या महामारीमध्ये समाजाला मदत करणाऱ्या आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करण्यासारखे प्रकार घडले. समाज हिताचे केलेल्या कामांवर लोकांनी आक्षेप घेतले नाहीत.
अशा पद्धतीचे सध्या राज्यात काम सुरू असून जिल्ह्यातील काही नेते उठता बसता फोटो घेऊन सोशल मीडियावर टाकत आहेत, अशी टिका त्यांनी केली. आम्ही अनेक पिढ्यापासून विकासाची कामे करत आहोत.
कोरोना महामारीत केंद्र सरकारने निधी कमी दिला. त्यामुळे कामांना वेग देता आला नाही. परंतु यापुढे जिल्ह्यातील सर्व कार्यालयामार्फत कुठल्याही मागणीवर ३० दिवसामध्ये कारवाई करून लेखी स्वरुपात माहिती सबंधितांना देण्याची व्यवस्था करु, असे ते म्हणाले.
कोणी काही टिका केली तरी विकासकामे करणारच असल्याचे त्यांनी सागितले. यावेळी परिसरातील अनेक कुटुंबातील रुग्णांची जनसेवा फौडेशनच्या माध्यमातुन मोफत शस्त्रक्रिया झालेल्या कुटुंबाच्या वतीने खासदार विखे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अजय रक्ताटे यांनी केले तर आभार देशमुख यांनी मानले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम