अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, सर्वसामान्य, गोरगरीब, माणसासाठी काम करत आलेला आहे. काँग्रेसने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेतलेले आहे. परंतु, केंद्रातील भाजपाचे सरकार गेल्या ७२ दिवसापासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे.
हे शेतकरी विरोधी सरकार आहे. राज्यातील आघाडी सरकार मात्र शेतकऱ्याबरोबर आहे, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुक्यातील प्रगतशील शेतकरी व आदर्श अंगणवाडी सेविकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.
याप्रसंगी डॉ. तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य डॉ. उषाताई तनपुरे होत्या. तर व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास समितीच्या सभापती मीनाताई शेटे, प्रांताधिकारी अनिल पवार, प्रशिक्षणार्थी प्रांत अधिकारी जगताप, तहसीलदार एफ.आर. शेख, प्रकल्प अधिकारी बाल विकास एन. जी. राऊत, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब आढाव, संजय पोटे व उपाध्यक्ष अजित तारडे आदी उपस्थित होते.
यावेळी वाफारे म्हणाले, शेतकरी जगला तर समाज जगणार आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण दुर्दैवाने हे भाजप सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरत असून शेतकऱ्यांना नको असलेले कायदे करून त्यांच्यावर लादत आहे.डॉ. तनपुरे म्हणाल्या, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी स्थिर सरकार दिले आहे. शेवटच्या माणसाच्या प्रश्नासाठी हे सरकार काम करत आहे.
या सन्मान सोहळ्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते पंडूतात्या पवार, रावसाहेब भिंगारदे,बी. आर. खुळे, मुकिंदा काळे, प्रकाश आढाव, बाबासाहेब कारले, विक्रम कारले, अरुण खिलारी, किरण पवार आदींसह ब्राह्मणी मंडळातील विविध गावचे प्रगतशील शेतकरी, अंगणवाडी सेविका, काँग्रेसचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव यांनी तर सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले. आभार संजय पोटे यांनी मानले.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved