जाणून घ्या प्लेटलेट्सचे म्हणजे काय आणि त्यांचे शरीरातील महत्त्व !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  प्लेटलेट्स हा मानवी रक्ततील एक महत्त्वाचा घटक आहे. याचे मुख्य काम असते, रक्त पातळ हाेऊ न देणे, रक्तवाहिन्यांना नुकसान झाल्यास रक्तस्रावाला अटकाव करणे.रक्तत प्रामुख्याने तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स हे घटक असतात.

हे प्लेटलेट्स हाडांतील मज्जेत असणाऱ्या मेगा कॅराॅसाईट्स, या पेशींपासून तयार हाेतात.प्लेटलेट्स या तीन ते चार दिवसांत नव्याने तयार हाेत असतात.

जखम झाल्यावर जास्त रक्त वाहणे धाेकादायक असते, अशावेळी प्लेटलेट्स रक्तप्रवाहाला अटकाव करण्याचं काम करतात. शरीरात दीड ते साडेचार लाख प्लेटलेट्स असतात.

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी औषधे नसतात, प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी पाेषक आहार व आराम करणे हाच पर्याय असताे. प्रमाणापेक्षा जास्त प्लेटलेट्स असणेही याेग्य नाही.

रक्तत प्लेटलेट्स जास्त प्रमाणात वाढले असेल तर त्याचा आराेग्यावर वाईट परिणाम हाेताे, कारण यात र्नताची गुठळी हाेण्याची श्नयता असते.

यामुळे हृदयराेग, फुफ्फुसांचे आजार हाेण्याची श्नयता असते. प्लेटलेट्स कमी झाले असतील तर रुग्ण व्य्नतीला डाॅ्नटरांच्या निरीक्षणाखाली राहावे लागते.

गरज भासल्यास प्लेटलेट्स रुग्णाला देता येतात.रक्तपेढ्यांमध्ये जमा हाेणाऱ्या र्नतातील प्लेटलेट्स वेगळे करून हाॅस्पिटलमध्ये दिल्या जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!