8 रोजी अहमदनगर महाविद्यालयाच्यावतीने आयपीएस तेजिस्विनी सातपुते यांचे व्याख्यान

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- नगर – अहमदनगर महाविद्यालयात उन्नत भारत अभियान व गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने 8 मार्च 2021 जागतिक महिला दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला दिनानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी व सध्या सोलापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तेजिस्विनी सातपुते यांचे ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमास डॉ. स्वाती बार्नबस प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस उपस्थित राहणार आहे. समाजातील असंख्य समस्यांची सोडवणूक करण्यासाठी महिला सक्षमीकरण आवश्यक आहे

तरच समाज व राष्ट्रामध्ये परिवर्तन होऊन विकास होऊ शकतो. या वेबिनारसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.सुनील कवडे व प्रा विलास नाबदे यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News