बिबट्याचा शेळीवर हल्ला, ठसे आढळल्याने …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील सरगडवस्तीवर गुरुवारी रात्री बिबट्याने शेळीवर हल्ला केला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

जवखेडे परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांना भीतीचे वतावरण आहे. सरगरवस्ती परिसरात पिंजरा लावण्यात येणार आहे.

नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावध राहण्याचे आवाहन तिसगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी केले आहे.

दादासाहेब सरगड हे बुधवारी रात्री उसाच्या शेतात पाणी देण्याासाठी शेतकरी गेले असता, त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी नागरिकांना व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.

गुरुवारी रात्री दादासाहेब सरगड यांच्या शेळीची बिबट्याने शिकार केली. तिसगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी सहकाऱ्यांसह जाऊन पंचनामा केला आहे.

बिबट्याचे ठसे आढळल्याने या भागात बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी दादासाहेब सरगड यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe