बिबट्याचा दुचाकीवरील दाम्पत्यावर हल्ला!  महिला जखमी : या ठिकाणी घडली घटना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  जिल्ह्याच्या अकोले व संगमनेर या जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्याकडून मानसावंर हल्ले करण्याचे प्रकार वाढतच आहेत.

नुकताच अकोले तालुक्यात एका शेतमजुरास बिबट्याने झडप घालून उसाच्या शेतात ओढत नेवून ठार केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच परत सकाळी मोटारसायकलवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याने हल्ला केला.

या हल्ल्यात रुपाली सचिन खेमनर असे जखमी महिलेचे नाव आहे. ही घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, खेमनर दाम्पत्य सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून चिंचेवाडीकडे जात होते.

ते दाम्पत्य संगमनेर ते साकूर रस्त्यावरील चिंचेवाडी परिसरात आले असता बिबट्याने त्यांच्या मोटरसायकलवर हल्ला केला. यात रूपाली खेमनर या जखमी झाल्या. वनखात्याने पिंजरा लावून बिबट्या बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe