‘या’ तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- पाथर्डी तालुक्यातील जवखेड खालसा तिसगाव कार्यक्षेञातील वनविभागाने शेतात लावलेल्या पिंजऱ्यात आज संध्याकाळी आठच्या सुमारास बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे.

येथे सुमारे आठ महिन्यानंतर सरगड वस्तीवर बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले होते. गुरुवारी राञी दादासाहेब सरगड यांच्या वस्तीवर बिबट्याने शेळीची शिकार केली होती.

यापूर्वी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घालत अनेक लहान मुलांचा बळी घेतला होता. या घटनांच्या आठवणीमुळे या परिसरातील नागरिक प्रचंड भितीच्या सावटाखाली  होते.

सरगड वस्तीवर दादासाहेब सरगड यांच्या वस्तीवर बिबट्याने शेळीची शिकार केली होती. त्याची वनविभागाने तातडीने दखल घेत

काल संध्याकाळी सहा वाजता वन कर्मचारी कानिफ वांढेकर  वन अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शेतामध्ये पिंजरा लावला होता.

अखेर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने येथे राहणाऱ्या नागरिकांमधील भिती दूर झाली आहे.  बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांनी वन कर्मचारी कानिफ वांढेकर वन अधिकारी दादासाहेब वाघुलकर तसेच वनविभागाचे  आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe