अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-नेवासे तालुक्यातील भालगाव येथील नागरिक महेश भागवत, प्रा. उमेश भागवत हे शेतातून गुप्ताईमार्गे त्यांच्या कारने भालगावकडे येत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या श्रीकांत भागवत यांच्या शेतातून त्यांना ३ बिबटे एका पाठोपाठ कारला आडवे आले.
त्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. तरीही त्यांनी गाडीतून त्या बिबट्याचे व्हिडीओ प्रशासनास व नागरिकांसाठी काढून ठेवले. गेल्या काही दिवसांपूर्वी याच बिबट्यांनी भालगाव येथील सतीश भागवत यांच्यावर हल्ला करून डोक्यावर, छातीवर व खांद्यावर गंभीर जखमा केल्या असल्याची घटना मागील महिन्यात घडली होती.
गेल्या काही दिवसांत परिसरातील ४ शेळ्यांचा फडशा या बिबट्यांनी पाडला. बिबट्याच्या लोकवस्तीत होणाऱ्या दर्शनामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर दहशतीखाली आहेत. वन खात्याने या ठिकाणी पिंजरा लावला.
पिंजऱ्यात भक्ष न ठेवल्याने बिबट्या अद्यापही यात अडकत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. भालगाव गुप्ताई परिसरात बिबटे पकडण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्यास भक्ष ठेवावे.
रात्री अपरात्री घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी, अशी मागणी वनविभागाकडून करण्यात आली. वनपाल देविदास पातारे, वनमजूर भीमराज पाठक, वनरक्षक मुस्ताक सय्यद यांनी भालगाव येथे २ पिंजरे लावले आहेत.
आदर्श गाव हिवरे बाजार येथे होणार कोरोना योद्धांचा सन्मान
वाचा सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 https://t.co/u4toeBhY7c
— Ahmednagar Live24 (@Ahmednagarlive) May 11, 2021
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|