अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कोपरगाव तालुक्यातील जुन्या मुंबई- नागपूर महामार्गावरील घारी येथील उमरी नदीकाठी दिवसा बिबट्याचा वावर असल्याचे आढळले आहे.
बुधवारी (दि. १९) शेतात काम करण्यास गेलेल्या किशोर पवार या शेतकऱ्याने पाहिले व आरडाओरड करून ही बाब इतर शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

डाऊच बुद्रुक व घारी गावच्या मधून उमरी नदी वाहते. नदीच्या काठी दाट झाडी असल्याने बिबट्याला लपायला जागा मिळाली आहे.
बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी सध्या परिसरातून होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम